बॅक टू रूटीन...

मी आधीच्या ब्लॉगमध्ये वेटींग लिस्ट असताना प्रवास किती त्रासदायक ठरू शकतो ते सांगितलं पण, गंमत म्हणजे जवळ -  जवळ अर्धा प्रवास मी पुस्तकात डोकं खुपसून केला आणि मग काहीवेळाने तुझं नाव काय? कुठे उतरणारेस? असं म्हणत मी माझ्या शेजारी बसलेल्या मुलीशी ज्या गप्पा मारल्या त्या अगदी ती उतरेपर्यंत. त्यातल्या त्यात तिचा तो बोलका, हसरा, मोकळा स्वभाव मला आवडला आणि तिचं मला लक्षात राहणारं वाक्य म्हणजे, ‘मी बघतेय तुला मगापासून, तुला पुस्तक वाचायचा शौक दिसतोय’. 2 मिनिटांसाठी मी तिचं हे वाक्य ऐकतच राहिले पण भारी वाटलं काहीतरी वेगळं ऐकून. गावी गेले आजी, मामा - मामी, ताई, दादा, लहान भावंड सगळ्यांना भेटले. वातावरण, प्रवासाची साधनं, राहणीमान काहिकाळासाठी बदललं पण, माझी आई म्हणत होती तसं, ‘गावी चल म्हणजे अगदी बरं वाटेल, फ्रेश वाटेल’. अगदी तसंच फ्रेश वाटतयं. परतीचा प्रवास काही फार बरा नव्हता पण, जातानाच्या प्रवासापेक्षा बराच बरा होता. कारण, परतीच्या प्रवासाच्या वेळी आयत्यावेळी बुकिंग करून देखील सीट मिळाली होती आणि अजून एक गंमत सांगू? मी आज प्रवासाने इतकी थकलेली असताना ऑफिसमधून चक्क 1 तास लवकर सुटलेय. इतका आनंद झालाय म्हणून सांगते.  बरं मला रूटीनमधून ब्रेक हवा असला की मी सरळ गावी पळते. पण, मग जर तुम्हाला रूटीनमधून ब्रेक हवा असेल तर तुम्ही काय करता?

Comments

Popular posts from this blog

वेटींग लिस्ट

सुट्टी! सुट्टी! सुट्टी!