वेटींग लिस्ट

मी खूप खुश होते की २ दिवस का होईना गावी जाता येतंय. रोजच्या कंटाळवाण्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळं करता येतंय. हे काँक्रीटच जंगल सोडून, काही दिवस खऱ्या - खुऱ्या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात जाता येतय. पण, गावी जात असताना तिकीट बुक नसलं की फार मोठ्या - मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं अर्थात बसायला सीट मिळणं, गर्दीत सतत आपण बसलेली सीट जाऊ नये जागेवरून अगदी वॉशरूमला देखील न जाता, टीचभरसुद्धा न हलता तिथेच बसून राहणं, अशा प्रवासात झोप तर अगदीच दुर्मिळ असते. अशीच काहीशी हालत माझी झालीय. लोक कधी उतरतील, ट्रेन कधी खाली होईल आणि त्यांनी खाली केलेल्या सीट्सवर जाऊन 5 मिनिटं का होईना पण, मी कधी झोपतेय असं माझं झालंय. एक गंमत म्हणजे सीटर कोचमध्ये वरच्या सीट्स चक्क बुक नसतात हे मला आजच कळतंय. इतर काही वेटींग लिस्टमधील प्रवाश्यांप्रमाणे सध्याच्या घडीला उगीच जगातला सर्वात सुखी माणूस असल्याचा आव आणून, मीही सर्व प्रवाशांच्या डोक्यावर असलेल्या या सीट्सपैकी एका सीटवर बसून नक्की मी बसलेल्या सीटवर किती जणांचा डोळा आहे ते पाहतेय. आता हा प्रवास कधी संपतोय किंवा निदान थोडीशी झोप तरी कधी मिळतेय ह्याचीच मी आता वाट पाहतेय. 

- Feeling sleepy, tired, hungry, and also jealous( who have reserved seats) with 60 others in coach.

Comments

Popular posts from this blog

बॅक टू रूटीन...

सुट्टी! सुट्टी! सुट्टी!