Posts

Showing posts with the label diary

वेटींग लिस्ट

मी खूप खुश होते की २ दिवस का होईना गावी जाता येतंय. रोजच्या कंटाळवाण्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळं करता येतंय. हे काँक्रीटच जंगल सोडून, काही दिवस खऱ्या - खुऱ्या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात जाता येतय. पण, गावी जात असताना तिकीट बुक नसलं की फार मोठ्या - मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं अर्थात बसायला सीट मिळणं, गर्दीत सतत आपण बसलेली सीट जाऊ नये जागेवरून अगदी वॉशरूमला देखील न जाता, टीचभरसुद्धा न हलता तिथेच बसून राहणं, अशा प्रवासात झोप तर अगदीच दुर्मिळ असते. अशीच काहीशी हालत माझी झालीय. लोक कधी उतरतील, ट्रेन कधी खाली होईल आणि त्यांनी खाली केलेल्या सीट्सवर जाऊन 5 मिनिटं का होईना पण, मी कधी झोपतेय असं माझं झालंय. एक गंमत म्हणजे सीटर कोचमध्ये वरच्या सीट्स चक्क बुक नसतात हे मला आजच कळतंय. इतर काही वेटींग लिस्टमधील प्रवाश्यांप्रमाणे सध्याच्या घडीला उगीच जगातला सर्वात सुखी माणूस असल्याचा आव आणून, मीही सर्व प्रवाशांच्या डोक्यावर असलेल्या या सीट्सपैकी एका सीटवर बसून नक्की मी बसलेल्या सीटवर किती जणांचा डोळा आहे ते पाहतेय. आता हा प्रवास कधी संपतोय किंवा निदान थोडीशी झोप तरी कधी मिळतेय ह्याचीच मी

सुट्टी! सुट्टी! सुट्टी!

 आठवडाभर तेच तेच रूटीन जगत असलेल्या, रोज तोच प्रवास आणि काम करून कंटाळलेल्या माणसांकरिता सुट्टी मिळणं म्हणजे विरार ट्रेनमध्ये फोर्थ सीट मिळणं किंवा न सांगता आपल्या लहान भावंडांनी आपली कामं ऐकणं, भर उन्हात अचानक पाऊस पडल्यासारखं हे सगळं आहे. काम करणारा प्रत्येक एम्प्लॉइ आणि इंटर्नशीप करणारा प्रत्येक विद्यार्थी हा नेहमीच एखाद्या जास्तीच्या सुट्टीची वाट पाहत असतो आणि आजच्या दिवशी काय झाले असेल बरे?! मलाही मिळालीय अशीच सुट्टी तीही फक्त 1, 2 दिवसांची नव्हे तर चक्क 3 दिवसांची. आता या रोजच्या रूटिनचे पाश तोडून, ट्रेनमध्ये बसून ♪हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने♪, म्हणत मी गावी जाणार आणि 3 दिवसात जमेल तितकं जाड - जुड आणि स्ट्रेस फ्री होऊन येणार.